Cabinet Decision Maharashtra: मंत्रिमंडळ बैठकीत 12 महत्त्वाचे निर्णय

Cabinet Decision Maharashtra: 1 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 12 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरास प्राधान्य देणारा मार्वल प्रकल्प, गडचिरोली जिल्ह्यातील खनिज व्यवस्थापनासाठी खनिकर्म प्राधिकरणाची स्थापना, वाहन कर सवलत व बाईक टॅक्सी धोरण तसेच जलसंपदा विभागात सिंदफणा नदीवरील बॅरेज प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त रेल्वे मार्ग व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, नागपूरमधील क्रीडांगणाचे रहिवासीकरण, आणि शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजुरीसारखे निर्णय घेतले गेले आहेत. सविस्तर वाचा

मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त: Cabinet Decision Maharashtra

दिनांक 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र सरकारने महत्वपूर्ण Cabinet Decision घेतले आहे.

  1. मार्वल – महाराष्ट्र रिसर्च अँण्ड व्हिजीलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोसर्मेंट लि.: शक्ति प्रदत्त समितीच्या अधिपत्याखाली, कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची कामे प्राथम्याने देणार.
    (गृह विभाग)
  2. गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज व विशिष्ट औद्योगिक गौण खनिजाच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करणार, यासाठीच्या प्रारूप अधिनियमास मान्यता
    (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
  3. नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेने निष्कासित केलेल्या वाहनांच्या अनुषंगाने सुधारित कर सवलत लागू करण्याचा निर्णय.
    (गृह विभाग-परिवहन)
  4. बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण : 1 लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात. रमानाथ झा समिती शिफारशी सुधारणेसह लागू करणार.
    (गृह विभाग-परिवहन)
  5. नागन मध्यम प्रकल्प, जिल्हा नंदूरबार प्रकल्पासाठी 161.12 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता
    (जलसंपदा विभाग)
  6. सिंदफणा नदीवरील निमगाव ता. शिरूर जिल्हा बीड कोल्हापूरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी 22.08 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता
    (जलसंपदा विभाग)
  7. सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब ता. शिरूर जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी 17.30 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता
    (जलसंपदा विभाग)
  8. सिंदफणा नदीवरील टाकळगाव (हिंगणी) ता. गेवराई जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी 19.66 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता
    (जलसंपदा विभाग)
  9. वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी 1 हजार 886 कोटी ५ लाख कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता, यातील 943.025 कोटी इतकी 50% रक्कम राज्य सरकार देणार
    (गृह विभाग/परिवहन)
  10. पुणे-शिरूर-अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा आणि काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या 2008 पथकर धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांवर पथकर
    (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  11. अजनी, नागपूर येथील देवनगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी च्या जागेवरील क्रीडांगणांचे आरक्षण रहिवासी करण्याचा निर्णय.
    (नगरविकास विभाग)
  12. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना धानासाठी पणन हंगाम २०२०-२१ करिता प्रोत्साहनपर ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचे अनुदान मंजूर
    (अन्न व नागरी पुरवठा)

अधिकृत सविस्तर माहितीसाठी: मंत्रिमंडळ निर्णय डाऊनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment