रात्री 12.30 ला आरोग्यमंत्री रुग्णालयात – डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची उडाली धांदल! Aroghyamantri Hospital Surprisen Visit

Aroghyamantri Hospital Surprisen Visit: राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मध्यरात्री 12.30 वाजता अमरावतीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला अचानक भेट देऊन रुग्णसेवेचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रुग्णालयातील वॉर्डमध्ये राऊंड घेतला, डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधला आणि उपलब्ध यंत्रसामग्री, उपचार पद्धती, तसेच सोयी-सुविधा तपासल्या.

रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचा आढावा

आरोग्यमंत्र्यांनी बाह्यरुग्ण (OPD) आणि आंतररुग्ण (IPD) विभागात जाऊन सद्यस्थितीची माहिती घेतली.

  • सध्या 321 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यात आली.
  • आतापर्यंत 51 यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या असून, डॉक्टर व वैद्यकीय चमूचे त्यांनी विशेष कौतुक केले.
  • किडनी प्रत्यारोपण ICU आणि NICU ला प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध सोयी-सुविधा तपासल्या.
  • रुग्णालयात असलेल्या यंत्रसामग्रीच्या कमतरतेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

सरकारचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Aroghyamantri Hospital Surprisen Visit
Aroghyamantri Hospital Surprisen Visit

रुग्णालयाच्या टप्पा 3 विस्ताराची मागणी

यावेळी रुग्णालयाच्या टप्पा 3 विकास प्रकल्पाचा प्रस्ताव आरोग्यमंत्र्यांच्या समोर मांडण्यात आला.

  • लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट यांसारख्या आधुनिक शस्त्रक्रियांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याची मागणी करण्यात आली.
  • आरोग्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव गांभीर्याने घेत संभाव्य उपाययोजना लवकरच राबवण्याचे आश्वासन दिले.

आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न; ठळक मुद्दे

आरोग्यमंत्र्यांकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक

आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच,

  • तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
  • रुग्णालयातील सेवा अधिक चांगल्या करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक मदत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आदर्श अंगणवाडी योजनेसाठी ₹24.99 कोटींची मंजुरी!

दौऱ्यात उपस्थित अधिकारी Aroghyamantri Hospital Surprisen Visit

या दौऱ्यादरम्यान आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते.

मध्यरात्री घेतलेल्या या दौऱ्यामुळे रुग्णालयातील सेवा अधिक प्रभावी करण्यास गती मिळणार आहे, तसेच रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नव्या योजना आणल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारकडून कांद्यावरील 20 टक्के निर्यात पूर्णपणे रद्द – अधिसूचना जारी

Leave a Comment