निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ! सहा महिन्याच्या थकबाकीसह मिळणार लाभ

Pensioners DA Increase: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या देखील दि.1 जानेवारी, 2024 पासून 50% महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

शासनाने असा आदेश दिला आहे की, राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तिवेतन, कुटुंब निवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेवर दि 1 जानेवारी, 2024 पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा (Pensioners DA Increase) दर 46% वरुन 50% सुधारीत करण्यात यावा.

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी, 2024 पासूनच्या थकबाकीसह माहे जुलै २०२४ च्या निवृत्तिवेतन, कुटुंब निवृत्तिवेतनासोबत रोखीने देण्यात यावी. असे आदेश देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे ही वाचा: आठव्या वेतन आयोगात पगारात मोठी वाढ!

तसेच ज्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना सदरचा (Pensioners DA Increase) निर्णय, योग्य त्या फेरफारांसह, लागू राहील असे आदेश शासनाने दिले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासनाने असाही आदेश दिला आहे की, महागाई भत्ता वाढीचा निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.

शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश, योग्य त्या फेरफारांसह, आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील.

अधिक माहितीसाठी: शासन आदेश पाहा

Leave a Comment