गुड न्यूज! लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उलट अधिकाधिक त्यामध्ये आणखी सुधारणा होणार Ladki Bahin Yojana Latest Update

Ladki Bahin Yojana Latest Update : लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर जगण्यासाठीचा आधार आहे,” असे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना खात्री दिली की ही योजना कधीही बंद पडणार नाही, उलट त्यामध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

महिलांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट – आनंदाश्रू अनावर

जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत रसिकाश्रय संस्थेने २० महिलांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडवून आणली. या भेटीदरम्यान महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. घरकाम करून अवघ्या ५०० रुपयांत कुटुंब चालविण्याचा संघर्ष सांगताना एका वृद्ध महिलेचा गहिवर झाला. मात्र, ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

योजना कधीही बंद होणार नाही

महिलांच्या भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उलट अधिकाधिक महिलांना फायदा मिळावा यासाठी आम्ही आणखी मदत कशी करता येईल, याचा विचार करत आहोत,” असे स्पष्ट केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझी लाडकी बहीण योजनेतून या लाभार्थ्यांना वगळले; या ‘निकषात’ बसणाऱ्या महिला योजनेतून बाहेर

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट नवीन शासन निर्णय येथे पाहा

महिलांची मागणी – दरवर्षी १०,००० रुपये सन्माननिधी

या भेटीत महिलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर दरवर्षी १०,००० रुपयांचा सन्माननिधी मिळावा अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच विचार केला जाईल, असे सांगितले. काही वृद्ध महिला या योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला!

महिलांसाठी अविस्मरणीय अनुभव – पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद

या भेटीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिलांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला.आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता त्यातून प्रवासही केला!” असे सांगताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

राज्यातील ‘या’ तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट पाहा

मुख्यमंत्र्यांकडून “रसिकाश्रय” संस्थेचे अभिनंदन

या भेटीचे आयोजन करणाऱ्या “रसिकाश्रय” संस्थेचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. गरीब आणि श्रमिक महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले. “राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सरकारचा मोठा निर्णय! लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना मिळालेला आर्थिक लाभ सुरक्षित

महिलांच्या मनात समाधान – “लाडकी बहीण योजना कायम राहील!”

या भेटीनंतर महिलांच्या मनात समाधान होते. “मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे आमच्यासाठी स्वप्नवत क्षण होता. लाडकी बहीण योजना पुढे सुरूच राहील, हे ऐकून खूप आनंद झाला,” असे एका महिलने सांगितले. (Ladki Bahin Yojana Latest Update)

लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी येथे पाहा

Leave a Comment