Tasik Tatva Adhyapak Mandhan : राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर असलेल्या अधिव्याख्यात्यांचे मानधन वेळेत देण्याचे नियोजन तंत्र शिक्षण संचालनालयाने करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले आहेत.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय तंत्रनिकेतनांमधील तासिक तत्वावरील अभ्यागत अधिव्याख्यात्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक व अधिकारी उपस्थित होते.
काय आहे निर्णय?
- शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये कायमस्वरूपी अध्यापकांबरोबरच अनेक अभ्यागत अधिव्याख्याते तासिका तत्त्वावर कार्यरत असतात.
- या अधिव्याख्यात्यांना सैद्धांतिक (थिअरी) तासासाठी रुपये ८०० आणि प्रात्यक्षिक तासासाठी रुपये ४०० प्रति तास मानधन दिले जाते.
- परंतु, अनेकदा या मानधनाला विलंब होतो, ज्यामुळे अधिव्याख्यात्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
- यावर तोडगा काढण्यासाठी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तंत्र शिक्षण संचालनालयाला अधिव्याख्यात्यांचे मानधन वेळेत देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
- यापुढे महाविद्यालयांनी तासिका तत्त्वावर असणाऱ्या अधिव्याख्यात्यांना दरमहा मानधन मिळेल असे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले आहे.
राज्यातील ‘या’ कंत्राटी शिक्षकांना यापुढे नियुक्ती मिळणार नाही – कंत्राटी भरतीचा शासन निर्णय
न्यायालयाने नव्याने तासिका तत्वावर अध्यपकांच्या नियुक्ती करण्यास स्थगिती दिली आहे. वाढती विद्यार्थी संख्या, नवीन अभ्यासक्रम, अधिव्याखात्यांची कमतरता यासंदर्भात न्यायालयात राज्य शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.