Ladki Bahin Yojana Benefits : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत लाभार्थी महिलांना उत्सुकता लागली आहे. आता याबाबत खुद्द राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता कधी?
दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभ कधी? याबाबत माहिती दिली.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (DBT द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या..
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासंदर्भात लेटेस्ट अपडेट पाहा
लाडकी बहीण योजनेच्या या 5 प्रकारच्या अर्जाची पडताळणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु 5 प्रकारच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. सविस्तर वाचा
लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी येथे पाहा
राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/