Mahahsscboard Hall Ticket 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता SSC (10th) व HSC (12th) बोर्ड परीक्षांचे (Hall Ticket 2025) जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी व १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च २०२५ च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी व १२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर १२ वीचे हॉल तिकीट दिनांक १०/०१/२०२५ रोजी पासून तर १० वीचे हॉल तिकीट दि. २० जानेवारी, २०२७ पासून Admit Card या Link व्दारे Download करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उपक्रम कोणते? संपूर्ण यादी
महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 10 वी आणि 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा नवीन वेळापत्रक
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 वेळापत्रक जाहीर
बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येथे पाहा
राज्यातील 132 आयटीआयचे नामकरण; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध; | Mahahsscboard Hall Ticket 2025
ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचना (PDF येथे पाहा)
- फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा इ.१० वी तसेच सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.१२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
- प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
- ज्या आवेदनपत्रांना “Paid” असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे “Paid Status Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
- अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “Extra Seat No Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
- Download केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव/आईचे नाव / जन्मतारीख / जन्मठिकाण अशा दुरूस्त्या असल्यास सदर दुरूस्त्या Online पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता Application Correction ही Link उपलब्ध करून देण्यात आलेली असून विहित दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर “Correction Admit Card ” या Link व्दारे सुधारीत Admit Card उपलब्ध होतील. विषय / माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात.
- ज्या आवेदनपत्रांनी “Paid ” असे Status प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होवून “Late Paid Status Admit Card” या Option व्दारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना नवीन सूचना निर्गमित