नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक (Registered homeopathy practitioners) व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र (CCMP) अभ्यासक्रम पूर्ण केल्यास, त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
संबंधित व्यावसायिक हे महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणे व शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (CCMP) उत्तीर्ण केला असणे आवश्यक आहे.
किरकोळ व घाऊक औषध विक्रेते हे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (CCMP) पूर्ण करणाऱ्या होमियोपॅथी नोंदणीकृत डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधांची विक्री करू शकतात. तसेच, किरकोळ औषध विक्रेते हे डॉक्टरांद्वारे देण्यात आलेले प्रिस्क्रीप्शनवर औषध विक्री करू शकतात.
महत्वाचे अपडेट्स : कंत्राटी कर्मचारी | अंगणवाडी कर्मचारी | सरकारी कर्मचारी | आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक | राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती येथे पाहा
तथापि महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायिक यांच्या प्रिस्क्रीप्शनवर औषधांची विक्री करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन क्रमांक व सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) ही अर्हता प्राप्त केल्याबाबतचा सर्टिफिकेट क्रमांक नमूद असल्याबाबत खात्री करूनच औषधांची विक्री करावी. ही जबाबदारी किरकोळ औषध विक्रेते यांची राहील. असेही आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री. नार्वेकर यांनी कळविले आहे.
इतर जॉब्स : विविध पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात पाहा | ITI जॉब | NHM भरती | SBI मध्ये भरती जाहिरात | या विभागात 800 जागांसाठीची भरती मूळ जाहिरात PDF येथे पाहा