Asha Worker and Group Promoters Salary GR : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2024-25 च्या राज्यशासनाच्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून आशा स्वयंसेविका (ASHA volunteers) व गटप्रवर्तक (Group Promoters) यांना नोव्हेंबर 2024 या कालावधीतील मोबदला रु.8272.31 लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण ५८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या (नोव्हेंबर) महिन्याचा वाढीव मोबदला शासन निर्णय पाहा
तथापि, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरीता त्यांना दिनांक १७ जुलै, २०२०, ०९ सप्टेंबर, २०२१ व दि.१० एप्रिल, २०२३ रोजीच्या शासन
निर्णयान्वये प्रत्येकी रु.५०००/- व ६२००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, दिनांक १४/०३/२०२४ च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांच्या मानधनात अनुक्रमे रु.५०००/- व रु.१०००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना, 7 हजार रुपये महिना – सविस्तर येथे पाहा
लाडकी बहीण योजनेच्या निकषांसंदर्भात; अधिकृत माहिती येथे पहा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु. ३२८६७.९९ लक्ष व सन २०२४-२५ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रु.८५४०८.४६ लह एकुण रु.११८२७६.४५ लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून रु.८२७२.३१ लक्ष इतके सुनदान माहे ऑक्टोंबर, २०२४ चे मानधन करण्यासाठी वितरीत करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट!
आता, उर्वरित अनुदानातून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना (Asha Worker and Group Promoters Salary) मोबदला अदा करण्यासाठी सन २०२४-२५ मध्ये रु.३२८६७.९९ लक्ष व सन २०२४-२५ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रु.८५४०८.४६ लक्ष असे एकुण रु.११८२७६.४५ लक्ष इतकी तरतूद राज्यशासनाने अर्थसंकल्पीत केलेली आहे. सदर मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना नोव्हेंबर २०२४ या १ महिन्याच्या कालावधीची रक्कम रु.८२७२.३१ लक्ष इतकी रक्कम लेखाशिर्ष २२१०४०१५ मधून वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय पाहा)
केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना, 7 हजार रुपये महिना – सविस्तर येथे पाहा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरती – जाहिरात, अर्ज डायरेक्ट लिंक
अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर
महत्वाची अपडेट! जिल्हा न्यायालय निवड यादी व प्रथम नियुक्ती आदेश जारी