Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट!

Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्यापूर्वी लाभार्थीच्या अर्जाची छाननी करण्यात येईल. यामध्ये ज्या महिला गरजू व पात्र आहेत त्यांनाच ही रक्कम मिळेल, त्यावरून लाभार्थीची संख्या कमी करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ज्या महिला व बालकल्याण विभागातर्फे ही योजना सुरू झाली त्याच्या माजी मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र त्याचे खंडन केले आहे.

आमदार अदिती तटकरे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचा खुलासा

आमदार अदिती तटकरे यांनी ट्विट करत लाडकी बहीण योजनेचा खुलासा केला आहे.

माझ्या नावाने खोटी माहिती पसरवून काही माध्यमांकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना अर्थसंकल्पात योग्य प्रकारे नियोजन करून कबूल केलेल्या २१०० रुपयांच्या लाभाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास २ कोटी ३४ लाख महिलांना लाभ मिळत आहे. ही योजना राबवत असताना सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी करूनच त्यांना लाभ वितरित करण्यात आला आहे. म्हणून, सध्या नोंदणी करत असलेल्या लाभार्थ्यांच्या पडताळणीच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही पडताळणी होणार नाही.

कृपया याबाबत कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये ही सर्वांना नम्र विनंती !

#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना

महिलांसाठी खास योजना;प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळणार, अर्ज येथे करा

लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा येथे पाहा

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे खाली दिलेल्या लिंकवर पहा संपूर्ण व्हिडिओ 👇

https://x.com/iAditiTatkare/status/1866473956548522241?t=KlX36LXrxyPWPW2XUXMa0Q&s=1

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा वाढीव मोबदला मंजूर

कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी

लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा येथे पाहा

Leave a Comment