8th Pay Commission : देशात सध्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू असून, लवकरच आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. केंद्र सरकार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते, काय आहे आठव्या वेतन आयोगाचे अपडेट सविस्तर वाचा..
8th Pay Commission
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 7 वा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आला होता, 10 वर्षानी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो, त्यामुळे आता 8 वा वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी 2026 पासून लागू केल्या जाऊ शकतात. केंद्र सरकार लवकरच पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू करणार असून आगामी अर्थसंकल्पात यासंदर्भात काही घोषणाही होऊ शकतात, अशी चर्चा आहे.
एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार लाभ
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. यामध्ये ८ वा वेतन आयोग (8th Pay Commission) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा फायदा होणार आहे, म्हणजेच एकूण 1 कोटींहून अधिक लोकांना याचा लाभ मिळणार आहे.
23 जुलै रोजी 2024-25 चा अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संघटना यांनी आगामी अर्थसंकल्पात ८ वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या अर्थसंकल्पात नवीन वेतन आयोगाची घोषणा होणार का? हे पाहावे लागणार आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार?
8 व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टरच्या वाढीसोबतच त्यांच्या पगारातही वाढ होऊ शकते. फिटमेंट फॅक्टर हे मुख्य सूत्र आहे जे 8 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्स मिळविण्यात मदत करते.
8 व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो?
फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या अलीकडील अहवालानुसार, फिटमेंट फॅक्टर 3.68 पट पर्यंत सेट केला जाऊ शकतो. असे झाल्यास 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे मूळ वेतनात 8000 रुपयांची वाढ होईल. यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल. मूळ पगार आणि महागाई भत्त्यासह एकूण उत्पन्नात 25-35 टक्क्यांची वाढ दिसून येते.
गुड न्यूज! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5 वा हप्ता मंजूर – परिपत्रक पहा
7 व्या वेतन आयोगात फिटमेंट क्षेत्र काय होते?
7 व्या वेतन आयोगामध्ये 2.57 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला ज्यामुळे किमान वेतन सुमारे 14.29 टक्क्यांनी वाढले. यानंतर किमान वेतन 18 हजार रुपये झाले होते.
नवीन वेतन आयोगामुळे या गोष्टी बदलतील
8 व्या वेतन आयोगामुळे मूळ वेतन, भत्ते तसेच पेन्शन आणि इतर आर्थिक लाभांमध्ये वाढ होईल, सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचे पगारात वाढ होईल, वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) यासह इतर भत्ते नवीन वेतन आयोगाच्या सूत्र आणि नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल.
कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना 5000 रुपयांची भरघोस वाढ
