मोठी बातमी! शिक्षण सेवकांच्या मानधनात तब्बल 10000 हजारांची भरघोस वाढ, राज्य सरकारचा निर्णय!

Teaching Staff Salary Increase : आदिवासी विकास विभागातील स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळातील शिक्षण सेवकांच्या मानधनात तब्बल 10000 हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 22 जुलै रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने राज्यामध्ये सन 2003 पासून सुधारीत प्राथमिक शिक्षण सेवक योजना (Shikshan Sevak) लागू करण्यात आली आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या एकूण 556 अनुदानित आश्रमशाळांतील एकूण 334 शिक्षण सेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आदिवासी विभागातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ

प्राथमिक शिक्षण सेवक आणि माध्यमिक शिक्षण सेवक यांच्या मानधनात 10000 रुपयांची वाढ करण्यात आली असून, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यांच्या मानधनात 11000 हजार रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे.

Teaching Staff Salary Increase
Teaching Staff Salary Increase

कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! जुलै महिन्याच्या पगारात होणार डबल फायदा

आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेमधील शिक्षण सेवकांचे मानधन व शालेय शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या शिक्षण सेवकांचे असणारे मानधन यामध्ये समानता रहावी तसेच दरम्यानच्या कालावधीत वाढलेली महागाई विचार करता सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय!

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करा

Leave a Comment