Asha Volunteers and Group Promoters Agitation : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने गुरुवार दि. 18 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
काय आहेत प्रमुख मागण्या
- दि. 9 जुलै रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनामध्ये बदल करुन दरमहा काम होणाऱ्या हेडखाली मोबदला उपलब्ध करुन देण्यात यावा.
- चार महिन्यापासून असलेले थकीत मानधन त्वरीत देण्यात यावे.
- गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा दहा हजार रुपये वाढीचा सुधारीत शासन निर्णय त्वरीत काढण्यात यावा.
- गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समावेश करुन कंत्राटीकरणाचे सर्व लाभ देण्यात यावेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत नियमित करण्यासाठी वेधले सरकारचे लक्ष
महाराष्ट्र राज्य आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक महासंघाची मागणी काय आहे?
महाराष्ट्र राज्य आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी (राष्ट्रीय आरोग्य अभियान) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM) जिल्हयात आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक कार्यरत असून, आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढीचा शासन निर्णय दि. १४ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला होता.
माझी लाडकी बहीण योजनेचा या दिवशी लाभ मिळणार
सदर शासन निर्णयानुसार राज्य शासनाचा वाढीव निधी वितरणाच्या मार्गदर्शक सुचना दि.९ जुलै २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्याकडुन सर्वसबंधीतांना देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनेनुसार अशा बऱ्याच हेडवर मोबदला विभागून दिलेला आहे, ज्या हेडखाली वर्षभरातुन एखाद-दुसऱ्या वेळेस काम होते.
त्यामुळे सरकारने मोबदल्यात वाढ केली परंतु प्रशासनाने ती रोखल्या सारखे झाले आहे. त्यामुळे दि.९ जुलै २०२४ च्या मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल करुन दरमहा काम होणाऱ्या हेडवर मोबदला विभागण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल 10 हजारांची वाढ – शासन निर्णय पाहा
यावेळी भगवानराव देशमुख प्रदेशाध्यक्ष, कमल बांगर प्रदेश कार्याध्यक्ष, दत्ता देशमुख राज्य संघटक, जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी एस. ए. अबुज, आर.एस. जगातप, आर. के. खांडे, के. डी. गव्हाणे, एस.एम. मुळे, एस. ए. चौरे, जे एस. ढाकणे, ए.एस. लांतुरे, आर.डी. कुलकर्णी, गटप्रवर्तक गलांडे, आशा ढाकणे, आशा बनसोडे, सीमा मस्के, बिस्मिल्ला पठाण, रेखा डोंगरदिवे यांच्यासह जिल्ह्यातील हजारो अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्या मंजुर व्हाव्या यासाठी १८ जुलै रोजी जिल्हा परिषद, बीड समोर दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत (Asha Volunteers and Group Promoters Agitation) धरणे आंदोलन करण्यात आले असून, महाराष्ट्र राज्य आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने प्रशासनाला या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बीड जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.