राज्यातील या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे बंधनकारक; तरच मिळणार सेवाविषयक लाभ अन्यथा सेवा समाप्त होणार

Teacher Eligibility Test : आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते.

दिनांक 1 डिसेंबर 2018 अन्वये ही विशेष भरती मोहीम राबविण्यात आली होती. यातील नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांना ही मुदत देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Teacher Eligibility Test ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येणार आहे.

राज्यातील 3105 कर्मचारी शासन सेवेत कायम-सविस्तर वाचा

ही मुदतवाढ देण्यापूर्वीच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पुढील सेवाविषयक लाभ देण्यात येतील. ही मुदतवाढ केवळ एक वेळची बाब म्हणून देण्यात येत आहे. या मुदतवाढी नंतरही जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील. असे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेचे सव्वा कोटी अर्ज पात्र; या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता आणि या योजनेचा लाभ मिळणार 

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीला मिळाले यश

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ’12’ मोठे निर्णय पाहा

Leave a Comment