Smart Anganwadi Kit : राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर होणार

Smart Anganwadi Kit : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर करणेसाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” उपलब्ध करुन देण्यासाठी, २४३० स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व त्याकरिता येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत आरोग्य, पोषण आहार, पुर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरविण्यात येतात, याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रुपांतरीत करणे आवश्यक आहे.

सदर केंद्रांमध्ये मुलांना आनंददायी वातावरणात पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य, पोषण आहार देण्यात येईल. तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! या जिल्ह्यात नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी

महत्वाचा निर्णय : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘विमा’ योजना लागू, अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका पदावर नियुक्ती

याकरिता अंगणवाडयांचा दर्जा सुधारुन व त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये वाढ करुन त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रुपांतरीत करण्यास यापूर्वी मान्यता दिलेली आहे.

शासन निर्णय : अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

त्यानुषंगाने आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर करणेसाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” (Smart Anganwadi Kit) उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्ति स्मार्ट अंगणवाडी किट रु. १,६४.५६०/- नुसार मे. गुनिना कमर्शियल प्रा. लि. यांचेकडून रु. ३९.९८.८०,८००/- एवढ्या रक्कमेची २४३० स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व त्याकरिता येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)

अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची अपडेट! ‘पोषण ट्रॅकर ऍप’ मध्ये हा मोठा बदल! येथे पाहा

महिला व बालविकास विभाग आढावा बैठक मुद्दे पाहा

राज्यातील अंगणवाडी केंद्रासाठी निधी वितरीत; शासन निर्णय जारी

Leave a Comment