Scholarship Exam Online Application : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या Scholarship परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र सुरू झाले आहेत.
राज्यातील शासनमान्य शाळांमधून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pre-Higher Primary Scholarship Examination (Std. 5th),
विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस (Pre-Secondary Scholarship Examination (Std. 8th) प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र (Scholarship Exam Online Application) परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या
इयत्ता 5 वी तसेच 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा योजनेतील Scholarship रकमेत गेल्या वर्षी मोठी वाढ करण्यात आली आहे.
त्यानुसार दिनांक 3 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार शासन निर्णय जारी केलेला आहे. शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये पुढीलप्रमाणे वाढ करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!
उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 5 वी करीता 500 रुपये प्रति माह प्रमाणे वार्षिक 5000 रुपये, तर माध्यमिक शाळा इयत्ता 8 वी करीता 750 रुपये प्रति माह प्रमाणे वार्षिक 7500 रुपये करण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीचे सुधारीत दर हे सन 2023 24 पासून लागू राहणार आहे.
उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, केवळ शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. [शासन निर्णय]
अधिक माहितीसाठी : येथे भेट द्या
मोठी अपडेट! बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक पहा
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…