Scholarship Exam Online Application : शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना पाहा

Scholarship Exam Online Application : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या Scholarship परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र सुरू झाले आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू

राज्यातील शासनमान्य शाळांमधून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pre-Higher Primary Scholarship Examination (Std. 5th),

विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस (Pre-Secondary Scholarship Examination (Std. 8th) प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र (Scholarship Exam Online Application) परिषदेच्या www.mscepune.inhttps://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिसूचना येथे पाहा

लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या

5 वी, 8 वीच्या विद्यार्थ्यांना किती मिळते शिष्यवृत्ती?

इयत्ता 5 वी तसेच 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा योजनेतील Scholarship रकमेत गेल्या वर्षी मोठी वाढ करण्यात आली आहे.

त्यानुसार दिनांक 3 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार शासन निर्णय जारी केलेला आहे. शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये पुढीलप्रमाणे वाढ करण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!

उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 5 वी करीता 500 रुपये प्रति माह प्रमाणे वार्षिक 5000 रुपये, तर माध्यमिक शाळा इयत्ता 8 वी करीता 750 रुपये प्रति माह प्रमाणे वार्षिक 7500 रुपये करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीचे सुधारीत दर हे सन 2023 24 पासून लागू राहणार आहे.

उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, केवळ शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. [शासन निर्णय]

अधिक माहितीसाठी : येथे भेट द्या

मोठी अपडेट! बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक पहा

CET Cell Schedule 2025-26 – Click Here

मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय!

Leave a Comment