Scholarship Exam : परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ! या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२४ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक
दि. ३१/१२/२०२४ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी.
शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज
लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या
अंगणवाडी आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय पाहा