RTE Lottery Result 2025 26 : राज्यातील पालकांसाठी एक आनंदाची बातमी, बऱ्याच दिवसापासून सर्व पालक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, ती म्हणजे RTE लॉटरी ची अंतिम यादी कधी जाहीर होणार, नुकतेच आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025 26 करिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली असून, पालकांना मॅसेज पाठवण्यात आले आहेत, आता राज्यातील 1 लाख 9 हजार 111 बालकांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
अखेर ‘आरटीई’ प्रवेशाचा मेसेज SMS आला
‘आरटीई’ अंतर्गत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पालकांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज (SMS) पाठवण्यात आले आहेत. तुम्हाला जर काही तांत्रिक अडचणीमुळे मेसेज मिळू शकला नसेल तर RTE पोर्टल सुरु होईपर्यंत वाट पहावी लागेल. त्यानंतर असा चेक करा तुमचा निकाल
‘आरटीई’ ची अंतिम निवड यादी जाहीर
‘आरटीई’ अंतर्गत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पालकांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज (SMS) पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर RTE च्या अधिकृत पोर्टलवर जिल्हानिहाय यादी आता उपलब्ध झाली आहे.
लॉटरीमध्ये एखाद्या बालकांचे निवड यादीत नाव असेल, मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोबाईलवर एसएमएस पोहोचू शकला नसेल यासाठी पालकांनी स्वतः आरटीई च्या पोर्टलवर जाऊन लॉगिन करून ऍडमिट कार्ड (Admit Card) या सेक्शन मध्ये जाऊन स्वतः खात्री करून घेणे आवश्यक आहे.
राज्यातील बालकांना मिळणार खाजगी शाळेत मोफत प्रवेश
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी खाजगी शाळेत 25 टक्के जागा या ‘आरटीई’ अंतर्गत राखीव ठेवण्यात येतात, त्यासाठी डिसेंबर, जानेवारी महिन्यात शैक्षणिक वर्ष 2025 26 (RTE Admission) करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
Maharashtra RTE Admission Lottery Selection List Announced – Download Here
1 लाख 1 हजार 969 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
RTE साठी राज्यभरातून 8 हजार 863 शाळांमधील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 5 हजार 159 अर्ज आले होते. त्यामधून लॉटरी पद्धतीने अर्जाची छाननी करून (RTE Lottery Result 2025) अंतिम यादीत बालकांना मोफत प्रवेशासाठी संधी मिळालेली आहे. यापैकी फक्त 1 लाख 1 हजार 969 बालकांचा प्रवेश निश्चित होणार आहे.