अखेर! ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, जिल्हानिहाय यादी पाहा..

RTE Lottery List Announced : मा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील आरटीई 25 टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे, ज्या बालकांचे यादीत नाव आले असेल, त्यांना मोबाईल वर दिनांक 22 पासून मेसेज पाठविण्यात येणार आहे, यादीत नाव चेक करून तुम्ही प्रवेशपत्राची प्रिंट काढून घेऊ शकता, किंवा तांत्रिक अडचणीमुळे मेसेज नसेल मिळाला, तर RTE पोर्टल वर जाऊन चेक करू शकता.

मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा करा पडताळणी

‘आरटीई’ ऑनलाईन सोडतीत (RTE Lottery List Announced 2024) प्रवेश मिळालेल्या बालकांच्या ऑनलाईन प्रवेश अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश आला असेल. किंवा Application Wise Details / अर्जाची स्थिती येथे आपण चेक करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तसेच RTE पोर्टलवरही बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिनमध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी खालील पोर्टल ला भेट द्यावी.

२३ जुलै ते ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रवेश निश्चित होणार

प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झाल्यानंतर पालकांना दिनांक २३ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घ्यावा लागणार आहे.

‘आरटीई’ प्रवेश निश्चित करण्यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण सूचना पाहा

‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची जिल्हानिहाय लॉटरी यादी येथे पहा

RTE 25 टक्के प्रवेश 2024 सोडत जाहीर झाली असून, राज्यातील जिल्हानिहाय सोडत यादी पाहण्यासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन तिथे Admited या सेक्शन मध्ये जाऊन चेक करा.

  • प्रथम – RTE च्या खाली दिलेल्या (https://student.maharashtra.gov.in/) या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • स्टेप 1 – त्यानंतर तिथे Selected / मूळ निवड यादी यावर क्लिक करा
  • स्टेप – 2 त्यानंतर Academic Year 2024-2025 निवडा
  • स्टेप – 3 आता तुमचा जिल्हा (District) निवडा
  • स्टेप – 4 आता तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला दिसेल, या यादीत तुम्ही नाव चेक करू शकता.

‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश लॉटरीची यादी जिल्हानिहाय येथे पाहा – डायरेक्ट लिंक

‘आरटीई’ पोर्टल वरून प्रवेशपत्र डाउनलोड करा

RTE च्या खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी लॉगीन करा आणि तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या, सोमवार पासून तुम्हाला कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी संबंधित कार्यालयात जावे लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रांची होणार पडताळणी

RTE चा अर्ज भरताना जी कागदपत्रे (आधार कार्ड, जन्मदाखला, उत्पन्नाचा दाखला, राखीव जागांसाठी आवश्यक कागदपत्रे) दाखवली होते, ते कागदपत्रे आता पडताळणी समितीकडून तपासणी होणार आहे, त्यानंतर तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित होणार आहे.

RTE Official Website : https://student.maharashtra.gov.in/

महत्वाचे – आरटीई ची सोडत आजच जाहीर झाल्यामुळे RTE वेबसाईट वर लोड असल्यामुळे स्लो होऊ शकते, त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा.

Leave a Comment