प्रतीक्षा संपली ! ‘आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा करा पडताळणी..

RTE Admission Lottery List : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क (Right to Education Act) अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत महत्वाचे परिपत्रक दिनांक 19 जुलै 2024 रोजी शिक्षण संचानलयाने काढले आहे, त्यानुसार आता दिनांक 20 जुलै रोजी ‘आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर झाली आहे.

मा. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार (Right to Education Act) दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची निवड यादी (RTE Admission Lottery List) व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली नव्हती. मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी जन हित याचिका व रिट याचिकेवर दिनांक १९/०७/२०२४ रोजी अंतिम निर्णय दिला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या दिनांक ०९/०२/२०२४ रोजीची अधिसूचना मा. उच्च न्यायालय मुंबई, यांनी रद्द केली असून, अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.

राज्यातील मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय!

‘आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी ‘आज’ जाहीर होणार

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक ०७/०६/२०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची लॉटरीची निवड यादी व प्रतिक्षा यादी (RTE Admission Lottery List) दिनांक २०/०७/२०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm portal या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

या सोडतीद्वारे शाळेमधी प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दिनांक २२/०७/२०२४ पासून SMS जाण्यास सुरुवात होईल.

‘लाडका भाऊ योजना’: सविस्तर तपशील पाहा

मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा करा पडताळणी

प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालकांनी दिनांक २३/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ पर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनालाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी आपल्या जिल्हयातील सर्व तालुकास्तरावरील पडताळणी केंद्राची तपासणी करुन पडताळणी समितीकडून अंतिम निवड होणार आहे.

तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील सूचनांचे पालन करावे अशा सूचना शिक्षण संचानालय पुणे यांनी दिल्या आहेत.

अधिक माहितीसाठी : https://student.maharashtra.gov.in/

RTE Admission Lottery List LEtter

1 thought on “प्रतीक्षा संपली ! ‘आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा करा पडताळणी..”

Leave a Comment