Old Pension Scheme : दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रूजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना (OPS) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,आता त्यानुसार पात्र संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी दोन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या धर्तीवर ‘या’ अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना (OPS) लागू
वित्त विभागाच्या दिनांक ०२/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी, कर्मचारी दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात, अधिसूचना दि.०१.११.२००५ पुर्वी निर्गमित झालेली आहे, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या
अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!
या निर्णयानुसार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र महाविद्यालयीन शिक्षण सेवा, गट-अ (वरिष्ठ महाविद्यालयीन शाखा) व महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशिक्षण शाखा), गट-अ या संवर्गातील पात्र अधिव्याख्यात्यांना सदर तरतुदी (OPS) लागू करण्यात आली आहे. (शासन निर्णय पाहा)
तसेच केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेतील सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. (शासन निर्णय पाहा)
पदनिर्मिती व पदनामनिहाय पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्चित; सुधारित शासन निर्णय जारी
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबत – शासन परिपत्रक