राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू – शासन आदेश

Old Pension Scheme : राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा शासन आदेश दिनांक ११ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी, कर्मचारी दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांची पदभरतीची जाहिरात, अधिसूचना, दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना दि २ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये Old Pension Scheme निर्णय घेण्यात आलेला आहे.

आता याच धर्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गात सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची प्रथम नियुक्ती ही, दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात, अधिसूचना निर्गमित केल्यानुसार झालेली आहे, त्यांना Old Pension Scheme लागू करण्याचा शासन आदेश दिनांक ११ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांसाठी

केंद्र शासनाच्या अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात, भरतीची, नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि. २२ डिसेंबर २००३ पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दि.१ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी, कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये निर्णय Old Pension Scheme लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा

Leave a Comment