Old Vehicle Scrap Tax Rebate MH: नवीन वाहन खरेदी करताय? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! जुने वाहन स्वेच्छेने मोडीत (Scrap) काढणाऱ्या वाहनधारकांना नव्या खरेदीवर 15% कर सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
काय आहे योजना? Old Vehicle Scrap Tax Rebate MH
- नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) जुने वाहन मोडीत काढल्यावर, नवीन वाहन खरेदीवर करात १५% सवलत मिळेल.
- परिवहन (ट्रान्सपोर्ट) वाहनांसाठी नोंदणीपासून ८ वर्षांच्या आत, तर परिवहनेतर वाहनांसाठी १५ वर्षांच्या आत वाहन मोडीत काढल्यास ही सवलत लागू होईल.
- एकदा वाहन मोडीत काढल्यावर मिळालेले ठेव प्रमाणपत्र (Certificate of Deposit) पुढील दोन वर्षांसाठी वैध असेल.
- ज्या प्रकारचे वाहन मोडीत काढले असेल, त्याच प्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना ही सवलत मिळेल. (उदा. दुचाकी मोडीत काढल्यावर, नवीन दुचाकी खरेदीवर सवलत)
- ही योजना अधिसूचना जाहीर झाल्यापासून तीन वर्षांसाठी लागू असेल.
HSRP जुने वाहनासाठी नोंदणी आवश्यक संपूर्ण माहिती येथे पहा
या योजनेचा फायदा काय?
- प्रदूषण कमी होईल: जुनी वाहने जास्त प्रदूषण करतात, त्यामुळे त्यांना मोडीत काढल्यास पर्यावरणाला फायदा होईल.
- नवीन वाहनांना प्रोत्साहन: यामुळे नवीन आणि सुरक्षित वाहनांची खरेदी वाढेल.
- वाहनधारकांना आर्थिक लाभ: कर सवलतीमुळे वाहन खरेदी करणे अधिक सोपे होईल.
अधिक माहितीसाठी:
- आपल्या जवळच्या परिवहन कार्यालयाशी संपर्क साधा.
- महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाच्या (https://transport.maharashtra.gov.in/) वेबसाइटला भेट द्या.