Old Pension Scheme Latest News : जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात अधिवेशनामध्ये सम्नाननीय सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने मा. उपमुखमंत्री (वित्त) यांनी 3 महिन्याच्या आत सरकार जुनी पेन्शन योजनेबद्दलचा निर्णय घेईल असे सांगण्यात आले होते, त्यानुसार आता ग्राम विकास विभागाने दिनांक 31 जुलै रोजी अत्यंत महत्वाचे परिपत्रक काढले आहे.
दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात, अधिसूचना निघालेल्या आणि दिनांक दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यांनंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात ग्राम विकास विभागाने दिनांक 31 जुलै रोजी अत्यंत महत्वाचे परिपत्रक काढले आहे.
जुनी पेन्शन योजनेचा अंदाजित आर्थिक भार किती पडणार? याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश
ग्राम विकास विभागाने दिनांक 31 जुलै 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार दि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) लागू करणेसाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार 15 दिवसात शासनास सादर करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, दोन शासन आदेश येथे पहा
तसेच सदर प्रकरणी मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी कालमर्यादा नमूद केली असल्याने आपले स्तरावर तातडीने कार्यवाही करुन माहिती शासनास सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी. असे परिपत्रकात म्हटले आहे.
महागाई भत्त्यात वाढ! सहा महिन्याच्या थकबाकीसह मिळणार लाभ
जिल्हा परिषदेकडील कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार
वित्त विभागाच्या दि.2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या धर्तीवर दि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय घेण्यात आला आहे.
लाडकी बहिण योजनेची ऑफलाईन – ऑनलाईन यादी येथे पाहा
वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी याप्रकरणी किती कर्मचा-यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार यासंदर्भातील माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले आहे.
कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! जुलै महिन्याच्या पगारात होणार डबल फायदा
