NMMS Question Paper in Marathi PDF : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS Scholarship Exam) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी NMMS Question Paper in Marathi PDF तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर डाउनलोड करू शकता.
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप
केंद्रशासनामार्फत (शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली) २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे.
- महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
- शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.
NMMS Hall Ticket Released Download : mscepune in Download Link Here
एनएमएमएस प्रश्नपत्रिका सर्व माध्यम | NMMS Question Paper In Marathi PDF

NMMS Question Paper In Marathi PDF राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२३-२४ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) खाली दिलेल्या माध्यम आणि विषयनिहाय तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर डाउनलोड करू शकता.
NMMS प्रश्नपत्रिका संच व उत्तरसूची (Answer Key) Download
NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2023-24
NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2022-23
NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2021-22
NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2020-21
NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2019-20
NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2018-19
NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2015-16-17
TET Answer Key 2024 Download Here
CTET Admit Card 2024 Released (ctet.nic.in): Download Link Here
लाडकी बहीण योजनेच्या निकषांसंदर्भात; अधिकृत माहिती येथे पहा
एनएमएमएस प्रश्नपत्रिका आराखडा | NMMS Question Paper

सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
१) विषय : सदर परीक्षेसाठी २ विषय असतील
- पेपर – १ ला :- बौध्दिक क्षमता चाचणी (MAT):- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
- पेपर २ रा :- शालेय क्षमता चाचणीः ही सामान्यतः इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण – ३५) ३. गणित (एकूण गुण – २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
उपविषयांवर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
- सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
- समाजशास्त्र ३५ गुण इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
- गणित २० गुण.
२) एनएमएमएस प्रश्नपत्रिका माध्यम
- परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.)
- विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल.
- दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे.
- पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
- एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
TET Answer Key 2024 Download Here
जिल्हा न्यायालय भरती निवड यादी व प्रथम नियुक्ती डाउनलोड करा
MPSC स्पर्धा परीक्षांचे (सन 2025 वर्षातील) अंदाजित वेळापत्रक जाहीर
लाडकी बहीण योजनेच्या निकषांसंदर्भात; अधिकृत माहिती येथे पहा
NMMS Hall Ticket Released Download : mscepune in Download Link Here