NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत Female Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist पदांच्या अंतिम निवड यादीच्या भरती संदर्भात एक अत्यंत महत्वाचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत काढण्यात आले आहे.
आरोग्य विभाग, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मोबाईल मेडीकल युनिट साठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात NHM अंतर्गत सदरची जाहिरात zpthane.maharashtra.gov.in आणि www.nrhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती.
त्यानुसार दिनांक 13 फेब्रुवारी ते दि 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत उमेद्वारांची मुळ कागदपत्रांसह मुलाखत घेण्यात आली. त्यानुसार उमेद्वारांची गुणांकण पध्दतीने निवड करण्यात आली असुन दिनांक 5 मार्च 2024 रोजी पात्र उमेद्वारांची अंतिम गुणवत्ता निवड यादी ही संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या संदर्भात अपडेट पाहा
त्यानुसार निवड झालेल्या उमेद्वारांनी समुपदेशनाकरीता 1:3 या प्रमाणात मुळ कागदपत्रांसह खालील नियोजित ठिकाणी विहित वेळेत उपस्थित राहण्याच्या महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. जर तुम्ही या भरती साठी अर्ज केलेला असेल आणि गुणवत्ता निवड यादीत नाव असेल तरी तुम्ही अवश्य खालील नियोजित ठिकाणी उपस्थित राहावे.
- दिनांक :- 24/07/2024
- समुपदेशनाचे ठिकाण : आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे, पहिला मजला सभागृह बागळे इस्टेट रोड नं.२२, जि.एस.टी भवन समोर, स्टेट बँकेजवळ ठाणे
- वेळ:- सकाळी १०:०० वाजता
‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश लॉटरीची यादी जिल्हानिहाय पाहा
महत्वाची सूचना : गैरहजर असणारे उमेद्वार निवड प्रक्रियेतुन बाद करण्यात येतील याची गांभिर्याने नोंद घ्यावी असे आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशात म्हंटले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (ठाणे) : मूळ आदेश आणि गुणवत्ता निवड यादी येथे पाहा
अधिकृत माहितीसाठी : zpthane.maharashtra.gov.in
