आनंदाची बातमी! राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी

NHM Employee Increased Remuneration Approved : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मे, 2024 आणि जुन, 2024 या कालावधीतील मोबदला मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 22 जुलै 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केला आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2024-25 च्या राज्यशासनाच्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मे, 2024 ते जुन, 2024 या कालावधीतील मोबदला रु.16544.62 लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

मोठी बातमी! आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक (Asha volunteers and Group promoters) हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वयेआशा स्वयंसेविकांना 5000 आणि गटप्रवर्तक यांना 1000 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

मे आणि जुन 2024 या 2 महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2024-25 मध्ये रु. 32867.99 लक्ष इतकी तरतूद राज्यशासनाने अर्थसंकल्पीत केलेली आहे. सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना मे आणि जुन 2024 या 2 महिन्याच्या कालावधीची रक्कम वितरीत करण्यास दिनांक 22 जुलै रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 हजार रुपयांची मोठी वाढ – शासन निर्णय

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडयात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो.

अधिक माहितीसाठी : वाढीव मोबदला शासन निर्णय येथे पाहा

1 thought on “आनंदाची बातमी! राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी”

Leave a Comment