ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ : राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा करता येणार

Mukhyamantri Tirtha Darshan Yojana : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना‘ राबविण्यास मान्यता देण्यात आली असून, यामध्ये राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा करता येणार आहे, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 14 जुलै 2024 रोजी जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रात पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे.

तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास. भोजन. निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. लाभार्थी वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार असावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष 60 वरील ज्येष्ठ नागरिक असावा. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज (Online application) सादर करावे लागणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र ही संतांची भूमी

भारत देशात विविध धर्मांचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात. आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडीत असताना देखील आपल्या देवदेवतांचे, भगवंताचे नामस्मरण, चिंतन करीत आयुष्य जगत असतात.

ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होणार

देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते.

परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.

सुवर्णसंधी! ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज येथे करा

राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा करता येणार

सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” (Mukhyamantri Tirtha Darshan Yojana) सुरु करण्यात आली आहे.

भारतातील या तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत खालील 73 विविध तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार आहे.

Mukhyamantri Tirtha Darshan Yojana

महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत खालील 66 विविध तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार आहे.

Mukhyamantri Tirtha Darshan Yojana

अधिक माहितीसाठी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासन निर्णय पाहा

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी

Leave a Comment