Mahakosh Recruitment : महराष्ट्र राज्य शासनाच्या महाकोष विभागांतर्गत भरतीची जाहिरात mahakosh.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून आर मागविण्यात आले आहे, Mahakosh Maharashtra Gov In Recruitment PDF जाहिरात खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध
संचालनालय, लेखा व कोषागारे प्रादेशिक निवड समिती, पुणे विभाग तथा सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे यांचेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पदांचा तपशील
- पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant Group-C)
- वेतनश्रेणी : ७ व्या वेतन आयोगानुसार ८-१० (रु २९२००-९२३००)
- रिक्त जागा : ७५
- परीक्षेचा दिनांक व कालावधी : परीक्षेचा दिनांक व कालावधी https://mahakosh.maharashtra.gov.in/
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल,
या जिल्ह्यात 245 जागांसाठी मोठी भरती सुरू; जाहिरात PDF, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
आवश्यक शैक्षणिक अर्हता
- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता,
- तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमयदिचे किया इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र,
शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणना करण्याचा दिनांक प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु दिनांक : दि.३१.१२.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : दि.३०.०१.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
आवश्यक वयोमर्यादा : ऑनलाईन अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दिनांक ३०.०१.२०२५ रोजी किमान वयोमर्यादा १९ वर्षे व कमाल वयोमर्यादा अमागास उमेदवारांसाठी ३८ वर्ष तसेच इतर संवर्गातील उमेदवारांसाठी शासनाच्या नियमावलीप्रमाणे वयोमर्यादित सूट राहील,
इतर जॉब्स :| ITI जॉब | NHM भरती | SBI मध्ये भरती जाहिरात | या विभागात 800 जागांसाठीची भरती मूळ जाहिरात PDF येथे पाहा
Mahakosh Recruitment ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात https://mahakosh maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अभ्यासाची आहे.
- उमेदवारास ऑनलाईन अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर व या हेल्पलाईनचर संपर्क साधावा.
सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे या विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे व कोषागार कार्यालय, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखापाल गट-क (Junior Accountant Group-C) संवर्गातील सरळसेवेने भरतीसाठी फक्त ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. टपालाव्दारे हस्तवटवड्याने अथवा कुरिअरने पाठविलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबावदारी उमेदवाराची राहील.
Mahakosh Recruitment ऑनलाईन अर्ज कोठे करावा?
- उमेदवारांनी अर्ज करणेसाठी https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिलेल्या Junior Accountant JD Pune Online Link वर अर्ज सादर करता येईल.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी.
I am interested for government job.