शैक्षणिक

MahaHsscBoard Time Table 2025 : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 10 वी आणि 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा नवीन वेळापत्रक

MahaHsscBoard Time Table 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

बोर्डाकडून इ 10 वी, 12 वी परीक्षा फेब्रुवारी/मार्च -2025 चे वेळापत्रक जाहीर

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रक आता बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोलापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

Mahahsscboard Hall Ticket 2025 : 10 वी व 12 वीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट!

बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर, अधिकृत लिंक

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.२१/११/२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एमएचटी सीईटी अर्जासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्य माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट करावे.

CET Cell Schedule 2025-26 – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 वेळापत्रक पाहा

अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये.

इ १० वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक येथे पाहा

इ १२ वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक ( general and bifocal ) येथे पाहा

इ १२ वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक (VOCATIONAL)

अधिकृत वेबसाईट : https://mahahsscboard.in/

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

2 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

2 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

2 weeks ago