MAATR App ASHA Software : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), IICARE FOUNDATION आणि Capgemini यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत टॅब (Free Tab) वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा पवार (Ajit Dada Pawar) यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना टॅबचे वितरण करण्यात आले.
आशा स्वयंसेविकांना त्यांच्या पुढील कार्यासाठी या टॅबचा मोठा फायदा होणार असून, ग्रामीण आरोग्य सुधारण्यास आणि उज्ज्वल आरोग्यदायी भविष्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.
बारामती (Baramati) पंचायत समिती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) आणि IICARE फाउंडेशन अंतर्गत MAATR App ASHA Software कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार उपस्थित होते.
लेटेस्ट अपडेट : लाडकी बहीण योजना | आयएएस अधिकारी बदली यादी | ITI जॉब | NHM भरती
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात सदैव कटिबद्ध असलेल्या आशा सेविकांना मोफत टॅब वितरित करण्यात आले. यावेळी दादांनी आशा सेविकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. (आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या कार्यावर आधारित “द बर्ड आय” यांनी तयार केलेली शॉर्ट फिल्म पाहा)
या आशा वर्करने गायला लसीकरणाचा पाळणा, Video येथे पाहा
आशा व गटप्रवर्तकांना वाढीव मोबदला कधी? पाहा अपडेट
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या डिसेंबर महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय पाहा
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संतोष पाटील (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे; मा. डॉ. संतोष भोसले, संचालक, IICARE FOUNDATION, मुंबई; आणि मा. श्री. शैलेश कासार, सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट, HDFC, दक्षिण महाराष्ट्र यांची उपस्थिती होती. (संपूर्ण कार्यक्रम Youtube वर येथे पाहा)
आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना ‘सानुग्रह अनुदान’