Legislative Assembly : विधानसभेची 7 डिसेंबर रोजी मुंबईत बैठक

Legislative Assembly : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानभवन, मुंबई येथे उद्या शनिवार, दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी दिली आहे.

याचबरोबर महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक सोमवार, दि. ९ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. आयोजित करण्यात आली असल्याचेही विधानमंडळ सचिवालयामार्फत कळविण्यात आले आहे.

NHM कर्मचाऱ्यांचे शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची अपडेट

सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी

कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ

Legislative Assembly Speaker

Legislative Assembly Speaker : विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Comment