Lok Adalat : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! 33 वर्षात पहिल्यांदाच ‘लोक अदालत’ ! 542 प्रकरणांपैकी 138 प्रकरणे निकाली

Lok Adalat : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट), मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची सेवाविषयक प्रकरणे तातडीने व सामंजस्याने मार्गी लागावी म्हणून ३३ वर्षात प्रथमच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथील कार्यालयात ‘लोक अदालत’ आयोजित करण्यात आली होती.

या लोक अदालतीत तिन्ही खंडपीठ मिळून एकूण ५४२ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १३८ इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण, मुंबईचे विशेष कार्य अधिकारी (न्यायिक) सुरेश जोशी यांनी दिली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्यात 3% वाढ, या तारखेपासून लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मेकर टॉवर, ई-विंग, तिसरा मजला, कफ परेड, जागतिक व्यापार केंद्राच्या बाजुला, मुंबई येथे मॅट च्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नागपूर,मुंबई, छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील ५४२ प्रकरणांपैकी १३८ निकाली निघाली. यामध्ये मुंबई खंडपीठाच्या- २३८ प्रकरणापैकी ३९ निकाली तर नागपूर- खंडपीठाच्या १५० पैकी ६३ व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या १५४ प्रकरणांपैकी ३६ निकाली काढण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी

Leave a Comment