‘लाडकी बहीण योजने’साठी ‘6’ महत्वाचे बदल, लाडक्या बहिणीची संख्या आता 1 कोटीवर

Mukhyamantri Majhi Ladki Bahin : या योजनेची लोकप्रियता पाहता लाडक्या बहिणीची संख्या आता 1 कोटीच्या वर गेली आहे, यासाठी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे देखील कौतुक करण्यात आले आहे, अजूनही योजनेपासून वंचित असणाऱ्या महिला भगिनी अर्ज करत असून, या योजनेत आता सहा महत्वाचे (Ladki Bahin Yojana Six Change) बदल करण्यात आले आहे. सविस्तर जाणून घ्या.

लाडक्या बहिणीची संख्या 1 कोटीवर

Majhi Ladki Bahin Yojana : राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला राज्यातील महिलाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या अर्जदारांनी जवळपास 1 महिन्याच्या आताच 1 कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे. दिनांक 25 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत राज्यातील 1 कोटी 81 हजार 308 महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज दाखल केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडक्या बहिण योजनेचा लाभ या दिवशी डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण योजने’साठी मंत्रिमंडळ बैठकीत 6 महत्वाचे बदल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता पाहता आणि महिला भगिनींना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन Majhi Ladki Bahin या योजनेत वेळोवेळी सुधारणा करण्यात येत आहे, आता या योजनेत 6 महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते (Post Bank account) ग्राह्य धरलं जाणार आहे.
  2. एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे.
  3. ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात आवश्यक तो बदल करावा लागणार आहे.
  4. केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
  5. नव विवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड (Ration Card) पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
  6. ओटीपी (OTP) चा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.

असे 6 महत्वाच्या सुधारणा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आला असून, आता या महिलांना देखील योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारच्या लोकप्रिय या 7 सरकारी योजना पाहा

लाडकी बहीण योजनेत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक

Majhi Ladki Bahin Yojana या योजनेचे अर्ज भरण्यासाठी आणि गावागावात लाभार्थ्यांपर्यंत योजनेच्या प्रचार प्रसारासाठी अविरत कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कार्यकर्ते या सर्वांच्या योगदानाने सदर योजना राबविण्यात येत आहे. या उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महिला व बाल विकास मंत्री यांनी या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. तसेच आपण आपले काम असेच जोमाने सुरू ठेवून अधिकाधिक महिला-भगिनींना या योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत आवाहन केले आहे.

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्यासाठी गुड न्यूज पाहा

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ : सविस्तर तपशील पाहा

Leave a Comment