सरकारी योजना

महत्वाची अपडेट! लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या..

Ladki Bahin Yojana New Update : राज्यातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे, सदर योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना प्राप्त व्हावा, त्यासाठी लाडकी बहीण योजनेत नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे, यांसाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” (Majhi Ladki Bahin) योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता पुढीलप्रमाणे नवीन सूचना देण्यात आल्या आहेत.

थोडक्यात योजना – महत्वाची माहिती

  • योजनेचे नाव : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’
  • आर्थिक उत्पन्न अट : अडीच (2.5) लाखांपेक्षा कमी असावे
  • लाभ किती? : दीड हजार (रु 1500) महिना ; १८ हजार वर्षाला
  • पक्के लाभार्थी : पिवळी व केशरी शिधापत्रिकाधारक
  • महत्वाचे आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, बँक अकाऊंट, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला.

लाडकी बहीण योजनेच्या ‘या’ 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार

लाडक्या बहिणाला या दिवशी बँक खात्यात लाभ मिळणार 

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक पात्रता

  1. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  2. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  3. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  4. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Documents : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदारांना राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

लाडकी बहीण योजनेत आता नव्या सुधारणा

  1. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ग्रामस्तरीय आणि वॉर्ड स्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय
  2. अर्ज करण्यासाठी बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह सेतू सुविधा केंद्र, आपले सरकारसेवा केंद्रावरही भरता येणार अर्ज
  3. घरातील दोनपेक्षा अधिक लाडक्या बहिणींनाही आता मिळणार लाभ
  4. कुटुंबाच्या व्याख्येत आता पती-पत्नी आणि त्यांच्या अविवाहित मुला-मुलींचा देखील समावेश योजनेसाठी आता पोस्टातील बँक खाते ही ग्राह्य धरण्याचा निर्णय
  5. रेशन कार्डवर नाव नसलेल्या पतीचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाणार
  6. परराज्यातील महिलेच्या पतीचे राज्यातील पंधरा वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड अथवा मतदान ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार

हे ही वाचा :लाडकी बहीण योजने’साठी ‘6’ महत्वाचे बदल, लाडक्या बहिणीची संख्या आता 1 कोटीवर

अर्ज प्रक्रिया

  • ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  • अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नवीन वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

राज्य सरकारच्या लोकप्रिय या 7 सरकारी योजना पाहा

आपले सरकार पोर्टल सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी सूचना

“मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” (Ladki Bahin Yojana) योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल App, सेतू सुविधा केंद्रे येथून ऑनलाईन भरण्याची तरतूद करण्यात आली असून, आवश्यक असणारी काही कागदपत्रे, दाखले आपले सरकार (Aaple Sarkar Portal) पोर्टलद्वारे, महा- ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येतात. सदर योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाशी समन्वय साधून पोर्टल व डेटा सेंटर सुरळीतपणे सुरु राहील याची कृपया दक्षता घेण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!

सौजन्याची वागणूक देऊन आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याच्या सूचना

सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकार सेवा केंद्र, ई-सेवा केंद्र, (E-Seva Centre) सेतू केंद्र, तहसिल कार्यालये इ. येथे उपस्थित राहणा-या महिला अर्जदारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना सौजन्याची वागणूक देण्याबाबत आणि त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सविस्तर माहिती

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरुप, लाभार्थी, लाभार्थ्यांची पात्रता, योजनेमध्ये लाभ मिळण्याकरीता आवश्यक असणारी कागदपत्रे, योजनेची कार्यपद्धती इ. बाबी दिनांक ३ जुलै २०२४ रोजीच्या सुधारित शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आल्या आहेत. अधिक वाचा..

अधिक माहितीसाठी : शासन परिपत्रक पाहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नवीन वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

2 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

2 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

2 weeks ago