प्रतीक्षा संपली! लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन टप्प्यात मिळणार, पहिल्या टप्प्यात या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार -Ladki Bahin Yojana New Update Today

Ladki Bahin Yojana New Update Today : महायुती सरकारने माहे जुलै २०२४ मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची‘ घोषणा होती. त्यानुसार या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात गेल्या 5 महिन्यात 7 हजार 500 रुपये जमा झाले आहेत. यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता तर एकत्रच जमा झाल्याने महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाले होते. आता डिसेंबरच्या हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘X’ या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक ट्विट करत या योजनेबद्दल अपडेट्स दिले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेट काय आहे?

Ladki Bahin Yojana New Update Today : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘X’ वर दिलेल्या अपडेट नुसार, महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज (दि 24 डिसेंबर) रोजी पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन टप्प्यात मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता दोन टप्प्यात जमा होणार असून, पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात खालीलप्रमाणे पात्र महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे DBT द्वारे जमा करण्यात येणार असून, याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

  1. पहिल्या टप्प्यात : आधार सिंडीग राहिलेल्या सुमारे १२ लाख ८७ हजार ५०३ भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे, याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.
  2. दुसऱ्या टप्प्यात : सुमारे ६७ लाख ९२ हजार २९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा हप्ता सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे, आणि याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचे यादी पाहा

या पात्र लाभार्थी महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे

ही योजना का विशेष आहे?

1) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.

2) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.

3) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.

लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा पाहा

मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा आहे.

लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी येथे पाहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a Comment