लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर? मुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिली माहिती Ladki Bahin Yojana Installment Date

Ladki Bahin Yojana Installment Date : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट करताना लाडक्या बहीणींसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू होती, मात्र आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता (Ladki Bahin Yojana 6th Installment) देण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता कधी? | Ladki Bahin Yojana Installment Date

Ladki Bahin Yojana Devendra Fadnvis

राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Installment Date :राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी येथे पाहा

लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा येथे पाहा

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

त्यामुळे आता राज्याचे हिवाळी अधिवेशन दिनांक 21 डिसेंबर रोजी संपत आहे, त्यामुळे Ladki Bahin Yojana Installment Date सोमवार दिनांक 23 डिसेंबर पासून लाभयार्थ्याना वितरित करण्यास सुरुवात होऊ शकते, साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकतो.

लाडकी बहिणी योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पैसे कधी? महत्वाची अपडेट

केंद्र सरकारकडून महिलांसाठी दरमहा 7000 रुपये विद्यावेतन देणारी योजना – येथे पाहा

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना – वेबसाईट

अधिक माहितीसाठी : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र आता थांबणार नाही… – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट करताना पुढील ओळीतून आपली भूमिका मांडली…

या ओळी पुढीलप्रमाणे…

महाराष्ट्र आता थांबणार नाही… (Maharashtra will not stop now)

सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात, बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ, तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल, मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन, राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार, आनंदाचा शिधा देईल आधार, उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही, अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही…

असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ, कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या डिसेंबर महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय

Leave a Comment