ICDS Anganwadi : राज्यातील अंगणवाडी केंद्रासाठी निधी वितरीत; शासन निर्णय जारी

ICDS Anganwadi : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून राज्यातील अंगणवाडी केंद्रासाठी निधी वितरीत करणेबाबत ‘दोन’ महत्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहे. सविस्तर जाणून घेऊया.

राज्यातील 145 अंगणवाडी केंद्रासाठी निधी वितरित

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM JANMAN) या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यातील PVTG Habitation (Particularly Vulnerable Tribal Group) क्षेत्रामध्ये नवीन एकूण १४५ अंगणवाडी केंद्र सुरु करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्र बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी रुपये १२ लाख याप्रमाणे १०० टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यानुषंगाने केंद्र शासनाने १४३ अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाकरिता रुपये १७.१६ कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित असलेला रु.८.१६ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता उर्वरित रु. ९.०० कोटी इतका निधी पोषण अभियानाकरिताच्या लेखाशीर्षामधून पुनर्विनियोजित करून वितरीत करण्यात आला आहे. (शासन निर्णय पाहा)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

लाडकी बहीण योजना नवीन निकष येथे पाहा

चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित करण्याकरीता निधी वितरीत

ICDS Anganwadi : राज्यामध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये चाचा नेहरु बाल महोत्सव (Chacha Nehru Children’s Festival) आयोजित करण्याकरीता १२,०९,००,०००/- (अक्षरी रुपये दोन कोटी नऊ लाख फक्त) इतका निधी आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर

राज्यातील सर्व मुले व प्राधान्याने बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/ स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी ३५ जिल्ह्यांमध्ये व ६ विभागीय स्तरावर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात चाचा नेहरु बाल महोत्सव (Chacha Nehru Children’s Festival) आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)

3 डिसेंबर जागतिक दिव्यांग (अपंग) दिन घोषवाक्य

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना ‘सानुग्रह अनुदान’ निधी मंजूर, या तारखेपासून मिळणार लाभ!

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात भरघोस वाढ! परिपत्रक जारी

जागतिक दिव्यांग (अपंग) दिन 3 डिसेंबर रोजी का साजरा केला जातो? – जागतिक दिव्यांग दिन विशेष

Leave a Comment