Face Recognition System : मंत्रालयात प्रवेशासाठी फेस रेकग्निशन (FRS) तंत्रज्ञान लागू करण्यात आले असून, यामुळे सुरक्षितता वाढणार आहे तसेच शासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि गतीमान होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रणालीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
फेस रेकग्निशन तंत्रज्ञानामुळे अनधिकृत प्रवेशावर नियंत्रण
Face Recognition ही प्रणाली मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित करणार असून अनधिकृत प्रवेश रोखण्यात मदत करणार आहे. परिणामी, मंत्रालयाच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होईल आणि अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवता येईल.
तुम्हाला किती टॅक्स बसेल? जुना आणि नवा दोन्ही पद्धतीने तपासा एक क्लीकवर
मंत्रालयातील गर्दी आणि प्रवेश प्रक्रियेत सुधारणा
फेस रेकग्निशन प्रणाली (Face Recognition System) मुळे योग्य व्यक्तींनाच अधिकृत प्रवेश मिळणार आहे, परिणामी कामे जलद आणि सुकर होतील. याशिवाय, मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवून कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल.
सर्व कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल नोंदणी आवश्यक
अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, सर्व संबंधितांनी फेस रेकग्निशन प्रणालीसाठी त्वरित नोंदणी करणे आवश्यक आहे. फेस रीडिंग डेटा तातडीने अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही.
राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! NPS चा मार्ग झाला सुलभ!
आरएफआयडी कार्ड आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे प्रवेश
मंत्रालयाच्या सुरक्षा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत फेस रेकग्निशन ((Face Recognition System) आणि आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. १०,५०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा डेटा प्रणालीत समाविष्ट केला आहे. सर्व प्रवेशद्वारांवर अत्याधुनिक फेस रेकग्निशन यंत्रणा बसविण्यात आली असून, ती ‘गो लाईव्ह’ करण्यात आली आहे.
डिजिटल प्रवेश प्रणालीसह सुरक्षित मंत्रालय
जानेवारी २०२५ पासून मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेस रेकग्निशन (FRS) आणि आरएफआयडी कार्डच्या आधारे प्रवेश देण्यात येत आहे. तसेच, “डिजी-प्रवेश” या अॅपवर आधारित ऑनलाइन प्रवेश प्रणाली लागू करण्यात येणार आहे, ज्यामुळे अभ्यागत आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सुरक्षित आणि सोपी प्रवेश प्रक्रिया मिळेल.
मंत्रालय हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे ठिकाण असल्याने सुरक्षितता वाढविण्यासाठी फेस रेकग्निशन (FRS) तंत्रज्ञान हा अत्याधुनिक उपाय योजण्यात आला आहे.
राज्यात प्रथमच ‘राज्य आरोग्य धोरण’ लागू होणार! आरोग्य विभागाच्या बैठकीतील ठळक मुद्दे