Employees Late Attendance GR : राज्यातील क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यालयातील उशीरा उपस्थितीबाबत सुधारित तरतूदी करण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचा
एक दिवसाची नैमित्तिक रजा वजा करण्याबाबत तरतूद
कार्यालयीन उपस्थितीबाबत शासकीय नियमानुसार एखादा कर्मचारी जर एकाच महिन्यात तीन वेळा उशीरा कार्यालयात उपस्थित राहिला, तर त्याची एक दिवसाची नैमित्तिक रजा वजा करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.
सुधारित मार्गदर्शक सूचना
मात्र काही मुद्यांबाबत अद्याप स्पष्टता नसल्यामुळे नैमित्तिक रजा संपल्यानंतरच्या उशीरा उपस्थितीसाठी नेमक्या कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी. याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय विभाग कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी यांना सकाळी कार्यालयात येण्यासाठी एका महिन्यात जास्तीत जास्त दोन वेळा कार्यालयीन वेळमध्ये कमाल दीड तास उशीरा येण्याची सवलत असेल. तथापि त्यानंतरच्या तिसऱ्या उशीरा उपस्थितीसाठी संबंधित अधिकारी/ कर्मचाऱ्याऱ्यांची एक नैमित्तिक रजा वजा करण्यात यावी.
कर्मचाऱ्यांना ‘या’ दराने मानधन मिळणार, शासन निर्णय जारी
संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या एकाच महिन्यातील तीन पेक्षा अधिक वेळा उशीरा उपस्थितीसाठी (म्हणजेच सहाव्या, नवव्या इ) प्रत्येकी एक नैमित्तिक रजा वजा करण्यात यावी.
संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे खाती जर नैमित्तिक रजा शिल्लक नसेल तर त्यांचे मागणीनुसार एकाच महिन्यातील प्रत्येक तिसऱ्या उशीरासाठी प्रत्येकी एक या प्रमाणे अर्जित रजा वजा करण्यात यावी.
अर्जित रजा शिल्लक नसल्यास असाधारण रजा (विनावेतन) मंजूर करण्यात यावी.
सदर सवलत महिन्यातील केवळ पहिल्या नऊ उशीरा उपस्थितीसाठी असेल. त्यापुढील उशीरासाठी असाधारण (विनावेतन) रजा मंजूर करण्यात यावी.
परिवर्तित रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात येत असल्याने कोणत्याही परिस्थितीत उशीरा उपस्थितीसाठी ही रजा मंजूर करण्यात येऊ नये.
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय निर्गमित
शासकीय कार्यालयांची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
दिनांक २४ फेब्रुवारी, २०२० च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयांची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. सबब गट-अ ते गट-क च्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यालयीन उशीरा उपस्थिती ही सकाळी ९.४५ पासून दीड तास म्हणजेच सकाळी ११.१५ वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात यावी. तसेच शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेळ ही सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी असल्याने त्यांचे बाबतीत उशीरा उपस्थिती ही सकाळी ११.०० वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात यावी.
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे किंवा कर्मचाऱ्याऱ्यांच्या नियंत्रणाबाहेरील आकस्मिक घटनेमुळे जे कर्मचारी उशीरा येतील, त्यांची उशीरा उपस्थिती न मांडता ती क्षमापित करण्यात यावी. तथापि असे करताना, संबंधित विभागांनी यासंदर्भात खातरजमा करावी.
विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी प्रत्येक सहामाहीच्या अखेरीस अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत आढावा घेऊन वरीलप्रमाणे कार्यवाही करावी. अशा सुधारित तरतुदी (Employees Late Attendance GR) दिनांक 31 डिसेंबर रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा
केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी