गुड न्यूज! आश्वासित प्रगती योजना आणि वरिष्ठ निवड वेतनश्रेणीचा लाभ शिक्षकांना देखील मिळणार – मंत्री दीपक केसरकर

Ashwasit Pragati Yojana : एकाच वेतनश्रेणीतील शिक्षकांना वरिष्ठ निवड वेतनश्रेणी देण्याबाबत तसेच आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विधानपरिषदेत सांगितले.

एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना एकच निवड वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भातील शासन सकारात्मक आहे. यासंदर्भातील अहवाल केंद्र शासनाकडून मागविण्यात आला आहे. अहवालाअंती कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितले आहे.

राज्यातील २० टक्के शिक्षकांनाच निवड वेतनश्रेणी देण्याची अट ठेवल्याबाबत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. यावेळी उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर बोलत होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यावेळी सदस्य निलय नाईक, केशव दराडे, विक्रम काळे, ज.मो.अभ्यंकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

राज्यात एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (Senior Pay Scale) आणि २४ वर्षे पूर्ण झालेल्या २० टक्के शिक्षकांना निवड वेतनश्रेणी (Selection Pay Scale) लागू करण्यात येत आहे.

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन

मात्र सरसकट एकाच वेतनश्रेणीतील सर्व शिक्षकांना समान निवड वेतनश्रेणी देण्याबाबत केंद्र सरकारकडे अहवाल मागविण्यात आला आहे. यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे.

तसेच, आश्वासित प्रगती योजना (Ashwasit Pragati Yojana) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिली. त्याप्रमाणे शिक्षकांनाही द्यावी यासदंर्भात बक्षी समितीने निर्णय लागू केल्याने याबाबतचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू

Leave a Comment