Asha Worker Heartwarming Story : राज्यातील आशा सेविकांसाठी IICARE FOUNDATION च्या वतीने MAATR App ‘आशा सॉफ्टवेअर’ (Asha Software) कार्यक्रमाच्या निमित्ताने HealthGuru IICARE च्या YouTube चॅनेल वर आशा सेविकांसाठी नवनवीन Video प्रसारित करण्यात येतात, नुकतेच आशांसाठी रिपोर्टिंग करणे आणि एका आशा सेविकेची हृदयस्पर्शी कथा Video प्रसारित करण्यात आला आहे, नक्कीच ही कथा आपणास प्रेरणादायी ठरेल.
Table of Contents
आता रिपोर्टिंग होणार सोपे, वेळेत आणि तणावरहित
‘आशा सॉफ्टवेअर’ (Asha Software) च्या मदतीने रिपोर्टिंग कसे सोपे, वेळेत आणि तणावरहित होणार आहे हेसांगितलेले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आशांना अधिक वेगाने, अचूकपणे आणि अधिक चांगल्या कार्यक्षमतेने काम करता येणार आहे.
आरोग्य व्यवस्थेत क्रांती घडवून आणणारे हे MAATR सॉफ्टवेअर फक्त तुमचे काम सोपे करत नाही, तर समाजासाठी महत्त्वाचे योगदान देण्यास सक्षम करणार आहे. MAATR सॉफ्टवेअरच्या फायद्यांचा सखोल आढावा घ्या आणि आरोग्य व्यवस्थेला एक नवी दिशा देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होईल हे या व्हिडिओ मध्ये स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : आशा वर्कर, गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आशा संवाद – जीवन कौशल्यांची ओळख
आशा सेविकेची हृदयस्पर्शी कथा | Asha Worker Heartwarming Story
बाळाला झाकायचं महत्त्व शिकवलं
या व्हिडिओमध्ये एका आशा सेविकेची हृदयस्पर्शी कथा (Asha Worker Heartwarming Story) सांगितली आहे. ऊसतोड कामगाराच्या बाळाला उघडे पाहून तिच्या लक्षात आले की, बाळाला झाकणे किती महत्त्वाचे आहे. तिने त्या बाळाच्या आईला बाळ झाकून ठेवण्याचे फायदे सांगितले आणि बाळाला सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. हा व्हिडिओ नक्की पहा.
या आशा वर्करने गायला लसीकरणाचा पाळणा, लसीकरणाचे महत्त्व सांगणारे खास गाणे