Asha Worker Anganwadi Sevika Latest News : राज्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा सरकाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika), मदतनीस यांना सानुग्रह अनुदानासाठी प्रति वर्षी अंदाजे 1 कोटी 5 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असून, दिनांक 1 एप्रिल 2024 पासून सदर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
राज्यात गावपातळीवर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक यांच्यावर असते. या घटकांना आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सानुग्रह अनुदान देवून मदत देण्याचा शासनाचा मानस होता.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा वाढीव मोबदला मंजूर
अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे, या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर
अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये अनुदान मिळणार
त्यानुसार राज्यातील आशा स्वयंसेविका (Asha Worker), अंगणवाडी सेविका, मदतनीस, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील ‘या’ महिलांसाठी मोठी भेट! दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! आवश्यक पात्रता पाहा
सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार
सदरचा हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. सध्या 75 हजार 578 अशा स्वयंसेविका आणि 3622 गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात. हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सानुग्रह अनुदान देण्याचा शासन निर्णय पाहा
लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या..
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय पाहा