Anganwadi Sevika Madatnis GR : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाने जारी केला आहे.
राज्यातील 25 हजार अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांमध्ये व लाभार्थ्यांमध्ये पोषण आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडावा यासाठी अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑगस्ट महिन्यात करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 25 हजार अंगणवाडी केंद्रातील 50 हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाची ‘विमा सखी’ योजना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये, अर्ज येथे करा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या संदर्भात दोन शासन निर्णय निर्गमित
Anganwadi Sevika Madatnis GR
आता त्यानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील राज्यातील एकूण २५००० अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाची देयके अदा करण्याकरिता अर्थसंकल्पित तरतुदीमधून एकुण रुपये ७०७,०० लाख (अक्षरी रुपये सात कोटी सात लाख फ़क्त) एवढा निधी आयुक्त, महिला व बाल विकास पुणे यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा Anganwadi Sevika Madatnis GR निर्गमित करण्यात आला आहे. (शासन निर्णय)
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचना – परिपत्रक पाहा
अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे वेतन व प्रोत्साहन भत्ता शासन निर्णय पाहा
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय