Anganwadi Bharti Maharashtra 2025 : महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यभरात १८,८८२ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ५,६३९ अंगणवाडी सेविका आणि १३,२४३ मदतनीस पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक असेल आणि उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
७५,००० पदभरतीपैकी १८,८८२ पदे महिला व बालविकास विभागात
राज्यात एकूण ७५,००० पदभरती प्रक्रियेपैकी १८,८८२ पदे महिला व बालविकास विभाग अंतर्गत भरली जातील, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले. १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुख्यसेविका पदासाठी सरळसेवा आणि निवडीद्वारे ३७४ पदांची भरती परीक्षा होणार आहे.
अंगणवाडी भरतीची जाहिरात आणि अर्ज कोठे करावा? येथे पाहा
अंगणवाडी केंद्रे आणि महिला बचत गटांसाठी विशेष योजना
महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ तसेच अंगणवाडी केंद्रे आणि पदभरती संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला. (केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी)
पारदर्शक भरती आणि पोषण आहारासाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना
मुख्यसेविका पदभरतीबाबत बोलताना ८०% पदे सरळसेवेने आणि १००% निवडीद्वारे भरली जातील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, महिला बचत गटांसाठी ‘आदर्श कम्युनिटी किचन’ उभारणीला प्राधान्य देण्यात येणार असून, पोषण आहाराच्या पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
अंगणवाडी भरतीचा सुधारित शासन निर्णय येथे पाहा
अंगणवाडी केंद्रांचा विस्तार आणि मूलभूत सुविधा
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीत १०२ नवीन अंगणवाड्यांची गरज आहे, यासाठी सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक नगरपालिकेत महिला व बाल विकास विभागाचा अधिकारी असावा, अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्गखोल्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.
अंगणवाडी भरतीची जाहिरात आणि अर्ज कोठे करावा? येथे पाहा
बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, रईस शेख, सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, महिला बचत गटाच्या विभागीय अध्यक्ष जयश्री पांचाळ यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू, अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका पदावर नियुक्ती
अंगणवाडी सेविका