राज्यातील मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महत्वाचे निर्देश

Free Higher Education for Girls : राज्यातील मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला असून, याबाबत महत्वपूर्ण बैठक मंत्रालयात दि 12 जुलै रोजी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली, या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे निर्देश दिले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, यासाठी मुलींना मोफत उच्चशिक्षण (Free Higher Education For Girls) देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Free Higher Education for Girls maharashtra
Free Higher Education for Girls maharashtra

या निर्णयाची सर्व शासनमान्य विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी तातडीने अमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Higher Education For Girls : मुलींना मोफत उच्चशिक्षणाचा लाभ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करावा. यामध्ये ८ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण आणि परीक्षाशुल्कात संपूर्ण सूट देण्यात आली आहे. याची तातडीने अंबलबजावणी सुरू करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिले आहे.

मुलीसाठी मोफत शिक्षण : उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी ‘हे’ शासन परिपत्रक सोबत ठेवा

जर विद्यापीठ, महाविद्यालयांनी या मुलींकडून शिक्षण वा परीक्षाशुल्क वसूल केल्याच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही या वेळी त्यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट अंगणवाड्यांची भाडेतत्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड आणि संबंधित अधिकारीही उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी : मुलींच्या मोफत शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय पाहा

Leave a Comment