10 वी व 12 वी विद्यार्थ्यांना सवलत गुण मिळवण्याची संधी! या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार Maha Hssc Board Grace Marks Apply

Maha Hssc Board Grace Marks Apply : दरवर्षीप्रमाणे इयत्ता १० वी व १२ वी खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफ लाइन अर्ज मागविले जातात. माहितीचे संकलन कार्यालयाद्‌वारे हे गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंडळात पाठवले जातात. सन २०२४-२५ पासून ग्रेस गुणासाठी केली जाणारी प्रक्रिया ‘आपले सरकार’ पोर्टल द्वारा ऑनलाईन करण्यात आले आहे.

त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांनी या पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे १० मार्च, २०२५ पर्यंत सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

‘आरटीई’ ऑनलाईन प्रवेश सोडत जाहीर, यादी येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

महत्वाच्या सूचना

  • खेळाडू विद्यार्थी, जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार ॲपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
  • जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा प्राविण्यासाठी सवलत गुणांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • या अर्जाची प्रत शिक्षण मंडळासही प्रणाली‌द्वारे आपोआप पाठवली जाईल.
  • त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालय, अथवा शिक्षण मंडळास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणार नाहीत.
  • अशा प्रकाराचा ऑफलाइन अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

‘आपले सरकार’ पोर्टल : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची भरती! 

शालेय शिक्षण विभागाचा नवीन निर्णय

शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता आहारात मिळणार ‘हे’ नवीन पदार्थ!

Leave a Comment