राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, शासन आदेश जारी

Old Pension Scheme : दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे, याच धर्तीवर आता सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून शासन निर्णय काढण्यात आला आहे.

दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या आणि शासन सेवेत दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे.

कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! जुलै महिन्याच्या पगारात होणार डबल फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

गुड न्यूज! जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात ग्राम विकास विभागाचे परिपत्रक जारी

महागाई भत्त्यात वाढ! सहा महिन्याच्या थकबाकीसह मिळणार लाभ

त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी (S-20) या संवर्गातील संबंधित पात्र अधिकारी यांना Old Pension Scheme लागू करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. (शासन निर्णय)

तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशिक्षण शाखा), अधिव्याख्याता, शासकीय अध्यापक महाविद्यालय, गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील Old Pension Scheme लागू करण्याच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा

मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय येथे पाहा

Leave a Comment