अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांसाठी एकरकमी लाभ मंजूर, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! Anganwadi Employees Lump sum benefit

Anganwadi Employees Lump sum benefit : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या एकरकमी लाभाच्या प्रलंबित प्रकरणांबाबत एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.

महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

महिला व बालविकास विभागात अंगणवाडी १८,८८२ पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोणाला लाभ मिळणार?

  1. जे कर्मचारी 01 एप्रिल 2022 नंतर सेवानिवृत्त, मृत्यूमुखी पडले, राजीनामा दिला किंवा सेवेतून काढले गेले आहेत, त्यांना हा एकरकमी लाभ दिला जाणार आहे.
  2. हा लाभ अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना मिळणार आहे.
  3. लाभाची रक्कम: महाराष्ट्र सरकारने 12.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, जो पात्र कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची भरती! आवश्यक पात्रता व इतर माहिती पाहा

निधीचे वाटप कसे होणार?

  • 2024-25 आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेला निधी वितरित केला जाणार आहे.
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्यासाठी त्यांचे अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाकडे पाठवण्यात येणार आहेत.
  • संबंधित कर्मचाऱ्यांची संपूर्ण छाननी करून लाभ वितरित केला जाईल.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी खुशखबर! या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मंजूर

महत्वाचे मुद्दे

  • दिनांक ०१.०४.२०२२ नंतरच्या प्रकरणांची कार्यवाही: ०१ एप्रिल २०२२ नंतरच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या एकरकमी लाभाची प्रकरणे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत (Integrated Child Development Services) करण्यात येणार आहेत.
  • त्वरित कार्यवाहीचे आदेश: या प्रस्तावांची योग्य छाननी करून, लाभ संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही त्वरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • कोणाला लाभ मिळणार? या निर्णयामुळे राज्यातील अनेक अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका, ज्यांच्या लाभाची प्रकरणे प्रलंबित होती, त्यांना लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना ‘सानुग्रह अनुदान’ निधी मंजूर, या तारखेपासून मिळणार लाभ!

Leave a Comment